लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : हडपसर भागातील रामटेकडी परिसरातील दफनभूमीत दफन केलेल्या नवजात अर्भकाचा मृतदेह पळवून नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्यांची २० वर्षांची विवाहित नात सोलापूर जिल्ह्यातील सांगाोला येथे राहायला आहे. प्रसृतीसाठी नात माहेरी आली होती. ती भवानी पेठेतील महापालिकेच्या रुग्णालयात प्रसृत झाली. प्रसृतीनंतर नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले. त्यानंतर एक मार्च रोजी नवजात अर्भकाचे रामटेकडीतील एका दफनभूमीत दफन करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार ज्येष्ठ महिलेचे परिचित दफनभूमीत गेले होते. तेव्हा नवजात अर्भकाला ज्या भागात दफन करण्यात आले होते. तो भाग उकरल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती परिचिताने ज्येष्ठ महिलेला माहिती दिली.

त्यानंतर त्या दफनभूमीत गेल्या. दफनभूमीतील सुरक्षारक्षकांकडे चौकशी केली. तेव्हा सुरक्षारक्षकाने नवजात अर्भकाचा मृतदेहाबाबत माहिती नसल्याचे सांगितले. नवजात अर्भकाच्या मृतदेहाची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूने मृतदेह अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. त्यानंतर याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने यांनी दफनभूमीस भेट दिली असून, सुरक्षारक्षकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buried infants body stolen pune print news rbk 25 mrj