पुणे : गेले काही दिवस सातत्याने तेजीत असलेल्या मासळीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे मासेप्रेमी खवय्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारात आवक वाढल्याने मासळीचे दर २० ते ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – डब्ल्यूएचओच्या अकरा सदस्यीय सल्लागार समितीच्या सहअध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची नियुक्ती

पावसाळा सुरू झाल्याने खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने बाजारपेठेत मासळीची आवक कमी होऊन दरवाढ झाली होती. मात्र गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची आवक वाढली. खोल समुद्रातील मासळीची १० ते १२ टन, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलनची एकूण मिळून १५ ते २० टन आवक झाली, अशी माहिती मासळीविक्रेते ठाकूर परदेशी यांनी दिली. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांनी वाढ ‌झाली. दरम्यान, चिकन, मटणाचे दर स्थिर असल्याचे चिकनविक्रेते रुपेश परदेशी आणि मटणविक्रेते प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decrease in fish prices pune print news rbk 25 ssb