पुणे : समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात गेल्या आठवडय़ापासून मोसमी पाऊस सक्रिय असून, रविवारीही काही भागांत सरी कोसळल्या. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. दुसरीकडे गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे समुद्रातून भूभागाकडे बाष्प येत आहे. त्यातून राज्यातील काही भागांत अद्यापही पाऊस सक्रिय आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसर, रत्नागिरी, पुणे, महाबळेश्वर, नाशिक आदी भागांत हलक्या पावसाची नोंद झाली. विदर्भातील गोंदिया येथे मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी (१५ ऑगस्ट) पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील घाट विभागात काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. १६ ऑगस्टलाही या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, िहगोली, अकोला, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्यांत सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain possibility in some parts of konkan western maharashtra and vidarbha zws
First published on: 15-08-2022 at 02:11 IST