पुणे : कामावरुन काढून टाकल्याने दोघांनी तरुणावर गोळीबार केल्याची घटना बाणेर रस्त्यावर महाबळेश्वर हॉटेलजवळ घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आकाश बाणेकर (वय २८, रा. लवळे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत निलेश दत्तात्रय पिंपळकर (वय ३८, रा. गुजरात कॉलनी,कोथरुड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अदित्य दिपक रणावरे आणि सागर लक्ष्मण बनसोडे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाणेर रस्त्यावर महाबळेश्वर हॉटेलजवळ रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश पिंपळकर आणि रोहित ननावरे हे दोघे बाणेर येथील एका मोटार कंपनीत कामाला आहेत. कंपनीने रोहित याला कामावरुन काढून टाकले़. निलेशमुळे आपल्याला कामावरुन काढून टाकले, या गैरसमजुतीतून त्याने फिर्यादी यांना महाबळेश्वर हॉटेलजवळ बोलावून घेतले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला.

हेही वाचा : निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या!

त्यानंतर रोहित ननावरे याच्या मित्रांनी रोहितला घरी नेऊन सोडले. फिर्यादी आणि आकाश बाणेकर हे तेथे बोलत थांबले असताना रोहितला सोडून आदित्य रणावरे, सागर बनसोडे तेथे आले. त्यांच्याशी पुन्हा वाद झाला. तेव्हा आदित्य याने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यातील गोळी आकाश बाणेकर याच्या उजव्या पायांच्या मांडीला लागून तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune firing on a youth near mahabaleshwar hotel baner road pune print news rbk 25 css