पुणे: बदलापूर येथील एका शाळेतील दोन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना पुण्यातील वानवडी भागातील एका नामांकित शाळेतील ६ वर्षांच्या दोन मुलींवर चालत्या व्हॅनमध्ये चालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ४५ वर्षीय आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात असलेली आरोपीने गुन्ह्यात वापरलेली स्कूल व्हॅन दगडाने फोडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही…”, पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

स्कूल व्हॅनची तोडफोड केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्या स्कूल व्हॅनमध्येच लहान मुलीवर अत्याचार झाला. आम्हाला देखील लहान मुलं आहेत. आज लहान मुली, महिला सुरक्षित नाही. सरकारनं हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना सर्वात मोठी शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. व्हॅन फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे.