राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. याशिवाय शारिरीक तंदरुस्तीच्या बाबतीतही ते नेहमी जागरुक असतात. याचा प्रत्यय नुकताच पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात आला. अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोरच पोलीस उपायुक्तांना ‘थोडं बारीक व्हा’ असा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय झालं?

अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्तालयातील डीसीपी डॉ. काकासाहेब डोळे हे व्यासपीठावर प्रातिनिधीक चावी स्वीकारण्यासाठी आले होते. अजित पवारांनी यावेळी चावी देताना त्यांच्याकडे पाहून सर्वांसमोरच ‘जरा बारीक व्हा’ असा सल्ला दिला.

काकासाहेब डोळे चावी घेऊन स्टेजवरुन खाली उतरल्यानंतर अजित पवार यासंबंधी पोलीस आयुक्तांसोबतही या विषयावर चर्चा करत होते. पोलिसांनी तंदरुस्त राहावं यासाठी आपण आर आर पाटलांच्या काळात पोलिसांसाठी फिटनेस भत्ता सुरु केला याची आठवणही त्यांनी करुन दिली.

या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पालिका अधिकारी उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra deputy chief minister ajit pawar advice to dcp over weight in pune kjp 91 sgy