पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे ९ आमदारासह २ जुलै रोजी सहभागी झाल्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. या दरम्यान राज्यात होणार्‍या अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या नेत्याकडून आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रित यावे, अशी भावना अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलावून दाखवत आहे. त्याच दरम्यान आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार दांडी मारली आहे. मात्र या बैठक ठिकाणाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सरचिटणीस अजित घुले यांनी, लहान तोंडी आज मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस…! आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि नामदार अजितदादा पवारसाहेब अशा आशयाचा फ्लेक्स लावला आहे. हा फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा-आंबेगाव येथे शरद पवार यांची सभा झाल्यास त्यांचं स्वागत करण्यास निश्चित जाणार : दिलीप वळसे पाटील

या फ्लेक्स बाबत अजित घुले म्हणाले की, आपल राज्य सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. यासाठी आम्हाला साहेब आणि दादांनी एकत्रित पाहिजे. राष्ट्रवादी हा केवळ पक्ष नसून एक परिवार आणि जनतेशी बांधिलकी असणारा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या दोन्ही नेत्यांच मनोमिलन झाल्यास आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांनी मनोमिलन करून हजारो कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी द्यावी अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp workers poster for sharad pawar and ajit pawar in pune svk 88 mrj