पहिल्या पत्नीशी घटस्फोटानंतर झाल्यानंतर त्याने दुसरा विवाह केला. पण, दुसऱ्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघडकीस आले. त्याबाबत जाब विचारला असता दिलेल्या मानसिक त्रासातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने शर्टच्या कॉलरमध्ये चिठ्ठी लिहून ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>VIDEO: शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांची खबरदारी, चेहऱ्याला लावलं ‘प्लॅस्टिक कवच’

किरण जाधव (वय ४७, रा. कल्याणीनगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांची दुसरी पत्नी गीता, तिचा प्रियकर व त्यांच्या दोन नातेवाईकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१९ ते ४ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला.

हेही वाचा >>>पुणे:अतिक्रमणावर कारवाईसाठी पाठपुरावा करणाऱ्या पत्रकारावर कोयत्याने हल्ला; आई-वडिलांनाही मारहाण

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण जाधव यांचा पहिल्या पत्नीबरोबर घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी गीता हिच्याशी विवाह केला. काही दिवसांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे कुलदीप नावाच्या तरुणाबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले. त्याचा त्यांनी जाब विचारल्यावर पत्नीने त्याची कबुली दिली. मात्र, त्यानंतर तिने प्रियकराबरोबर उघडपणे संबंध कायम ठेवले. तिचे काही नातलगही नातेवाईकही तिला साथ देत होते. त्याचप्रमाणे वारंवार त्यांच्या घरी येऊन पैसे उकळत होते. या सर्वाचा मानसिक त्रास होत असल्याने किरण जाधव यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्यांनी दुसरी पत्नी, तिचा प्रियकर आणि काही नातेवाईकाविरुद्ध तक्रार अर्ज लिहला. तो अर्ज शर्टच्या कॉलरला लावून नंतर आत्महत्या केली.या प्रकरणात येरवडा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चिठ्ठीतील मजकुराच्या तपासावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of husband due to extramarital affair of second wife pune print news pam 03 amy