रावसाहेब पुजारी
भारतीय उपखंडातील बहुतांश शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे म्हणजे देशातील बहुसंख्य असलेल्या शेतकरी समाजाच्या जिवाशी खेळ आहे. याचे अनेक घटकांवर दूरगामी आणि विपरीत परिणाम होत असतात. यंदा त्याची प्रचिती अधिक तीव्रतेने समोर आलेली आहे.

भारतीय उपखंडातील बहुतांश शेती ही हवामान खात्याचे पावसाचे अंदाज आणि प्रत्यक्षात होणारा मोसमी पाऊस यावर अवलंबून आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस न पडणे म्हणजे देशातील बहुसंख्य असलेल्या शेतकरी समाजाच्या जिवाशी खेळ आहे. या चुकलेल्या आणि अंदाजपंचे हवामानामुळे अनेक घटकांवर दूरगामी आणि विपरीत परिणाम होत असतात. यंदा त्याची प्रचिती अधिक तीव्रतेने समोर आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळ किनारपट्टी, कोकण आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागात ७ जून किंवा त्यापूर्वीच र्नैऋत्य मोसमी पावसाचे हमखास आगमन होते. याबाबतचे अंदाज जाहीर करण्याच्या पद्धती वर्षांनुवर्षे ठरून गेल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील पावसाच्या नोंदीवरून हा ठोकताळा तयार झालेला आहे. पावसाला सुरुवात होते, कांही अंशी पेरण्या सुरू होतात. पुढे नक्षत्र बदलते, पाऊस कमी-जास्त होत राहतो. पण पेरण्यांचा हंगाम सुरुवातीच्या पावसामुळे सुरू होतो. पावसाचा ताण निर्माण झाल्यास काही वेळा येणाऱ्या खरिपाच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे चित्र सर्वसाधारणपणे आजवर चालत आलेले आहे. दोन पावसातील अंतर आणि पडणाऱ्या पावसाचे सातत्य यावरही खरीप हंगामाचे भवितव्य आधारलेले असते. यामुळे पावसाच्या अंदाजाला भारतीय शेतीसाठी विशेष महत्त्व आहे. याशिवाय राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संस्थासुद्धा पावसाचा अंदाज देतात. त्याचे त्यांनी टप्पे केलेले आहेत. वाऱ्याची दिशा आणि वेग यावर आधारित वेगवेगळे अंदाज ठरविले जातात. ते टप्प्या-टप्प्याने अधिक अचूक केले जातात. तसेच काही भागात घटमांडण्यांतून पावसाचे अंदाज जाहीर केले जातात. तसेच विविध पंचांगातील पाऊस अधिक विश्वासार्ह मानला जातो. ग्रह-ताऱ्याच्या भ्रमणावरून पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात. याशिवाय प्राणी, पक्षी आणि वृक्षांच्या पाना-फुलांतील बदलावरून, बहरण्यावरूनही पावसाचा अंदाज स्पष्ट केला जातो. या सगळय़ावर शेतकऱ्यांचेच नव्हे,तर अनेक संबंधित घटकांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे पावसाचा अंदाज हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. भारतीय हवामान खात्याच्या पावसाचे अंदाज अनुकूल असतील तर आपल्याकडील शेअर बाजार उसळी घेतो. प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास तो कोणत्याही क्षणी कोसळतो. यामध्ये गुंतवणूकदारांचे कोटय़वधीचे नुकसान होते.

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainfall forecasting and agriculture weather department monsoon rain kerala coast konkan and maharashtra amy
First published on: 05-07-2022 at 00:13 IST