उद्धव ठाकरेंची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया, “पाकिस्तानचे भारतातील स्लीपर्स सेल….”
२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या मागे पाकिस्तान असल्याचे समोर आले. ६ मेच्या रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. उद्धव ठाकरे यांनी या कारवाईचे स्वागत केलं आहे. तसंच भारतीय लष्कराने त्यांची ताकद दाखवून दिल्याचं म्हटलं आहे.