“ऑपरेशन सिंदूरला फक्त स्थगिती, पाकिस्तानने आगळीक केली तर…”; वाचा मोदींचं संपूर्ण भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला माहिती दिली. तसंच, त्यांनी पाकिस्तानसह संपूर्ण जगाला इशारा दिला. भारत यापुढे दहशतवादाला थारा देणार नाही, तसंच पाकिस्तानबरोबर यापुढची चर्चा फक्त दहशतवादविरोधातच होईल, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या २२ मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारतीयांना आश्वस्त तर केलंच, पण पाकिस्तानलाही थेट इशारा दिलाय. त्यांचं भाषण आपण जसं तसं पाहुयात.