“ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक”; राहुल गांधी म्हणाले, “मी…”
राहुल गांधी यांनी अमेरिकेतील दौऱ्यात ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक होती हे मान्य केलं आहे. ब्राऊन विद्यापीठात एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. राहुल गांधींनी ८० च्या दशकातील काँग्रेसच्या चुका मान्य करत त्याची जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं सांगितलं. भाजपाने यावर टीका करत राहुल गांधींवर देशाच्या विरोधात तिरस्कार पसरवण्याचा आरोप केला आहे.