मुलीच्या आत्महत्येनंतर आईचं थेट एकनाथ शिंदेंना पत्र, “साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या….”
बीडमध्ये १४ मार्चला छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षी या तरुणीने आत्महत्या केली. तिच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पत्रात तिने साक्षीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची विनंती केली आहे. पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोपही केला आहे. साक्षीच्या आईने न्याय मिळवण्यासाठी शिंदेंकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.