“मराठी माणूस बेसावध”, राज ठाकरेंनी ‘या’ मुद्द्यावरून केलं सतर्क; म्हणाले…
राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावर महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी मुंबईतील मराठी माणसाची संख्या कमी होत असल्याचं सांगितलं, पण मराठी माणूस नामशेष होणार नाही असं स्पष्ट केलं. मराठी माणसाने सावध राहण्याची गरज असल्याचं त्यांनी आवाहन केलं. गिरगावातील मराठी माणूस बाहेर गेला असं वाटतं, पण टॉवर्समध्येही मराठी माणूस राहतो, असं त्यांनी सांगितलं.