घटस्फोटानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, जुळ्यांना दिला जन्म; जोडीदाराचं नाव गुलदस्त्यात
हॉलीवूड अभिनेत्री अँबर हर्डने मदर्स डे २०२५ ला जुळ्या मुलांच्या जन्माची आनंदाची बातमी शेअर केली. ३८ वर्षीय अँबरने इन्स्टाग्रामवर मुलगी एग्नेस आणि मुलगा ओशन यांच्या पायांचा फोटो शेअर करत भावनिक कॅप्शन लिहिलं. डिसेंबर २०२४ मध्ये गरोदरपणाची घोषणा करणाऱ्या अँबरने तिच्या प्रजननाच्या आव्हानांवर मात करत आई होण्याचा अनुभव शेअर केला. अँबर हर्डच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.