Video: “अंदाज खरा ठरला…”, घटस्फोटानंतर प्रसिद्ध अभिनेता कथित गर्लफ्रेंडसह पोहोचला लग्नात
'पोन्नियिन सेल्वन' फेम अभिनेता रवी मोहन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटाची घोषणा करणाऱ्या रवीने चेन्नईत निर्माते इशारी गणेश यांच्या मुलीच्या लग्नाला त्याच्या कथित गर्लफ्रेंड केनिशा फ्रान्सिससोबत हजेरी लावली. दोघांनी सोनेरी रंगाचे कपडे घातले होते. या व्हिडीओमुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. रवीने नोव्हेंबरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता.