पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अंकिता लोखंडेने घेतला मोठा निर्णय, पोस्ट करत म्हणाली…
२२ एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान तणाव वाढला आहे. भारताने आता पाकिस्तानसाठी हवाई क्षेत्र बंद केलं असून पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी घातली. तसंच अनेक भारतीय कलाकारांनी आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. अंकिता लोखंडेने तिचा यूएसए शो रद्द करत देशाबरोबर उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे.