१ तास ४५ मिनिटांचा मर्डर मिस्ट्री सिनेमा पाहून बसेल धक्का, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना जगभरातील चित्रपट घरबसल्या पाहता येतात. क्राइम-थ्रिलर जॉनरचे चित्रपट विशेषतः लोकप्रिय आहेत. 'V1 मर्डर केस' हा तेलुगू थ्रिलर सिनेमा प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. पावेल नवगीथन दिग्दर्शित या चित्रपटात राम अरुण कास्त्रो आणि विष्णुप्रिया पिल्लई मुख्य भूमिकेत आहेत. एका मुलीच्या खून प्रकरणाभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.