‘महाराजा’पेक्षा दमदार कथा, ‘दृश्यम’हून दमदार क्लायमॅक्स! वीकेंडला OTT वर पाहा ‘हा’ सिनेमा
या वीकेंडला ओटीटीवर पाहण्यासाठी 'प्रवीणकुडू शप्पू' हा मल्याळम ब्लॅक कॉमेडी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट उत्तम पर्याय आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात बासिल जोसेफ, शौबिन शाहिर, चांदिनी श्रीधरन, चेम्बन विनोज जोसे व शिवाजीत यांनी भूमिका केल्या आहेत. बाबू नावाच्या व्यक्तीच्या खुनाभोवती फिरणारी कथा आणि दमदार क्लायमॅक्स यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. 'प्रवीणकुडू शप्पू' सध्या सोनी लिव्हवर उपलब्ध आहे.