“तुझ्या मुस्लीम नवऱ्याला सोडून दे” म्हणणाऱ्या पाकिस्तानीला अभिनेत्रीने सुनावलं, म्हणाली…
टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचं समर्थन केलं. एका पाकिस्तानी युजरने तिला मुस्लीम पतीला सोडण्याचा सल्ला दिला. यावर देवोलीनाने सडेतोड उत्तर देत, पाकिस्तानला त्याच्या देशातील दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. देवोलीनाने २०२२ मध्ये शानवाज शेखशी लग्न केलं असून, सध्या ती मातृत्वाचा आनंद घेत आहे.