ऋषी सक्सेनाला ‘अशी’ मिळाली होती ‘काहे दिया परदेस’ ही मालिका
'झी मराठी'वरील 'काहे दिया परदेस' ही मालिका २०१६ साली सुरू होऊन २३ सप्टेंबर २०१७ साली संपली. मराठी मुलगी व अमराठी मुलगा, शिव-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. शिवची भूमिका साकारणाऱ्या ऋषी सक्सेनाला ही भूमिका कशी मिळाली याबद्दल त्यानं 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ऑडिशनच्या शेवटच्या दिवशी त्याला संधी मिळाली आणि त्याच्या अभिनयामुळे त्याची निवड झाली.