ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज आणि इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विध्यमानाने दिनांक ७ जुलै २०२३ रोजी इंटेललेक्ट बीजवेअर सर्विसेस प्रायवेट लिमिटेड. महापे या कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामधून जमा होणारे रक्त हे श्री सत्य साई संजीवनी रुग्णालय, खारघर नवी मुंबई यांच्या रुग्णालयाला देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णालयामध्ये लहान मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी लागणाऱ्या रक्ताची गरज यामधून भागावली जाणार आहे. असे शिबीर रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजतर्फे नियमितपणे राबविले जाणार आहे. या शिबिरामध्ये एकूण १०३ लोकानी रक्तदान केले. शिबिरासाठी वैद्यकीय मदत डी. वाय पाटील ब्लड बँक यांनी उपलब्ध करून दिली.

हेही वाचा – डोंबिवलीत झाड, विजेचा खांब कोसळल्याने वाहतूक कोंडी

या वेळी रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईजच्या अध्यक्षा रेणुका साळवी. खजिनदार संजय गुप्ते, सचिव सुनीत गिरकर, अतुल भागवत, अपर्णा पाटणे, संकेत शेट्टी, सचिन देशपांडे, रश्मी पगार, हंसराज पगार, प्रीती देशपांडे, प्राची नायर उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good response to blood donation camp organized by rotary in thane ssb