अत्यंत क्रूरपणे सरस्वती वैद्यची हत्या कऱणारा मनोज साने हा आरोपी दुर्धर आजाराने त्रस्त असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरस्वतीला घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचा. त्यावरून त्यांच्यात भांडणे होत असल्याचेही समोर आले आहे. हेही वाचा. Mira Road Murder : किचन मध्ये मृतदेह शिजवायचा आणि जेवायला बाहेर जायचा; मनोज सानेचे अंगावर शहारे आणणारे क्रोर्य हेही वाचा. मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात… मीरा रोड येथे राहणार्या मनोज साने याने ४ जून रोजी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्या सरस्वती वैद्यची हत्या केली होती. तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून कुकरमध्ये शिजवले होते. त्याला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून १६ जुन पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.