साकेत पूलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून नवी मुंबई, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील मुंबई नाशिक महामार्गावर खड्डे पडले आहे. त्यातच हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून या मार्गावर ठाण्याहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर साकेत पूल ते माजीवडा आणि भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकवेर साकेत पूल ते भिवंडीतील अंजूर दिवे पर्यंत वाहतूक कोंडीत झाली आहे. त्यामुळे त्याचा फटका या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या चालकांना बसत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam due to potholes on saket bridge amy