Viral Video : शिक्षण, कला, कर्तृत्व यांना वयाचे बंधन नसते. एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करायची ठरवली आणि त्यासाठी मेहनत घेतली, तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळते. आजकाल सोशल मीडियावर आपण लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत अनेकांचे विविध कौशल्याचे व्हिडीओ बघत असतो. त्यात गाणे, नृत्य, अभिनय आणि विविध कलांमध्ये पारंगत असलेले अनेक व्हिडीओ असतात. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. या व्हिडीओत आजोबा एक अनोखा स्टंट करताना दिसून आले आहेत; जे पाहून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल.
सुरुवातीला व्हिडीओत तुम्हाला समुद्र दिसेल. त्यानंतर बोटीतून एक वृद्ध व्यक्ती बाहेर येत आहे. तसेच बोटीला काही साधने जोडलेली असतात. त्यापैकी लाइव्ह जॅकेटच्या साह्याने आजोबा पाण्यात तरंगताना दिसून येत आहेत. आजोबा बोटीच्या साह्याने पाण्यात एका दांड्याला पकडून वॉटर स्किइंग करताना (Water Skiing) करताना दिसून आले आहेत. तसेच काही वेळा हा स्टंट करता करता आजोबा पाण्यातदेखील उडी मारतात. हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या वयात तरुणांसारखा अनोखा स्टंट करणाऱ्या आजोबांचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
आजोबा दिसले वॉटर स्किइंग करताना :
वॉटर स्किइंग (Water Skiing) हा पाण्याच्या पृष्ठभागावर खेळला जाणारा खेळ आहे; ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बोट किंवा एखाद्या केबलच्या मदतीने पाण्यावर तरंगत ठेवले जाते. या व्हिडीओत आजोबादेखील वेगाने पाण्यातून जाणाऱ्या बोटीवर हा खेळ खेळताना तुम्हाला दिसून येतील. आजोबा ८७ वर्षांचे आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच पाण्यात हा स्टंट करताना आजोबांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे. आजोबा न घाबरता, स्वतःचा तोल जाऊ न देता अगदी बिनधास्त हा स्टंट करताना दिसून आले आहेत. आजोबांना व्हिडीओत स्टंट करताना बघून एखादा अभिनेता चित्रपटातील ‘सीन’ शूट करतो आहे, असे तुम्हाला नक्कीच वाटेल.
@goodnews_movement इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेकदा सकारात्मक व्हिडीओ पोस्ट केले जात असतात. काही तासांपूर्वी त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये वेगवान बोटीवर आजोबा स्टंट करताना दिसत आहेत. “वय फक्त एक संख्या आहे; आजोबा ८७ वर्षांचे तरुण आहेत,” अशी खास कॅप्शनदेखील या व्हिडीओला दिली आहे. बोटीची मदत घेऊन अनोखा स्टंट करणाऱ्या आजोबांचे नाव ‘डिक’ असे आहे. तसेच सोशल मीडियावर @waterskigrandpa या नावाचे आजोबांचे अकाउंटसुद्धा आहे. त्यांच्या अकाउंटनुसार आजोबा १९५४ पासून वॉटर स्किइंग करीत आहेत आणि दर आठवड्याला आजोबा त्यांच्या नातवंडे आणि मित्रांसह स्किइंगला जातात, असेसुद्धा सांगण्यात आले आहे.