Viral Post : अनेकदा सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण विविध युक्त्या वापरताना दिसून येतात. अनेक इन्फ्लुएंसर, कलाकार दररोजच्या जीवनातील गोष्टींवर कन्टेन्ट तयार करून खास व्हिडीओ बनवतात आणि त्यांचे फॉलोअर्स वाढवतात. सोशल मीडिया ॲपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्हाला तयार करण्यात आलेल्या अकाउंटवर नेहमी फोटो, व्हिडीओ, किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी अकाउंटवर पोस्ट कराव्या लागतात आणि वेळोवेळी सक्रिय राहावे लागते.तर आज सोशल मिडियावर सुद्धा असचं काहीसं पहायला मिळालं आहे. इन्स्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका रिक्षा चालनकाने अनोखा जुगाड केला आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यात एक रिक्षा आहे आणि रिक्षाचालक त्यात पाठमोरा बसला आहे.आणि या रिक्षातून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने या रिक्षाचा फोटो शेअर करत एक खास गोष्ट दाखवली आहे.जिथे रिक्षावाला बसतो अगदी त्याच्या समोर तुम्हाला इंग्रजी अक्षरात काही शब्द लिहिलेले दिसतील. तर हे दुसरं तिसरं काही नसून रिक्षाचालकाने आपल्या रिक्षात सोशल मिडिया ॲप इन्स्टाग्रामचा आईडी लिहिला आहे. तुम्ही फोटोत पाहू शकता की, इन्स्टाग्राम ॲपचे चिन्ह आणि OVER _YOUNG असे त्याच्या अकाउंटचे नाव त्याने लाल अक्षरात रिक्षात लिहून ठेवले आहे.जेणेकरून प्रवाशी त्यांचा प्रवास कसा झाला हे आवर्जून त्याला या अकाउंटवर संदेश पाठवून सांगतील.आणि अर्थातचं त्याचे फॉलोअर्स सुद्धा वाढतील. फॉलोअर्स वाढवण्यासाठी रिक्षा चालकाची अनोखी युक्ती तुम्हीसुद्धा या पोस्टमधून एकदा बघाचं..

हेही वाचा : उत्साहाच्या भरात शिक्षकांबरोबर चेष्टा करणं विद्यार्थ्याला पडलं महागात, VIDEO पाहताच नेटकरी म्हणाले, “अशा शिक्षकांनाही…”

पोस्ट नक्की बघा :

रिक्षात लिहिला इन्स्टाग्राम आईडी :

रिक्षाचालक प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी रिक्षाची सजावट करतात, रिक्षात पंखे लावतात, तर काही पुस्तके ठेवतात आणि या सगळ्या गोष्टी प्रवाशांचे मन नेहमीचं प्रसन्न करतात.तर यातील बरेच प्रवासी रिक्षाच्या अनोख्या गोष्टी पाहून रिक्षाचे फोटो किंवा व्हिडिओ इतरांन सोबत शेअर करताना दिसतात. तर या रिक्षाचालकाने सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवून ; हा भन्नाट जुगाड केला आहे. आणि म्हणूनच म्हणूनचं रिक्षा चालकाने इन्स्टाग्राम आईडी रिक्षात छापून घेतला आहे. जर प्रवाशांना त्यांचा रिक्षाचा प्रवास सोशल मिडियावर पोस्ट करायचा असेल तर रिक्षाचालकाचा आईडी वापरून प्रवासी रिक्षाचकाला टॅग करतील आणि सोशल मिडियावर त्यांचा प्रवास शेअर करू शकतील.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा फोटो (@udayan_w) या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या युजरने त्याचा रिक्षातील हा खास अनुभव शेअर केला आहे आणि रिक्षाचालकांच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा फोटोसुद्धा शेअर केला आहे. एक युजर ही पोस्ट पाहून ‘ही आपली नवीन पिढी आहे’ असे म्हणत आहेत.तर अनेकजण रिक्षा चालकाच्या कल्पनेचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rickshaw driver printed his instagram id on his rickshaw asp