Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी चक्क सापाला खाताना दिसत आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे, पण हे खरंय. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (a young girl eats snake, shocking video)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साप हा शब्द जरी कानावर आला तरी अंगावर काटा येतो. डोळ्यासमोर दिसला तरी भीतीपोटी आपण ओरडतो पण काही लोक असेही आहेत जे सापाला काकडी गाजर साखरे चावून खातात. असे अनेक देश आहेत जिथे सापाचा आहारात समावेश केला जातो. सध्या हा व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.

ही तरुणी चक्क सापाला खाते?

साप माणसाचा चावतो, हे तुम्ही आजवर ऐकले असेल पण तुम्ही कधी माणूस सापाला खातो, असे ऐकले आहे का? या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणीच्या समोर चार पाच साप पडलेले आहेl. त्यातील एक साप ती हातात घेते आणि सापाला खायला सुरूवात करते. ती चक्क गाजर काकडी प्रमाणे सापाला सुद्धा चावून खाताना दिसते. साप खाणाऱ्या या तरुणीला पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. काही लोकांना विश्वास बसणार नाही. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आपल्या देशातील नाही.

हेही वाचा : “बाबांचे स्वप्न पूर्ण केले पण ते आज हयात नाही” तरुणाची आई ढसा ढसा रडली, पाहा व्हायरल VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : G7 मध्ये जॉर्जिया मेलोनींनी ऋषी सुनक यांचे असे केले स्वागत; मिठी मारत किस करतानाचा VIDEO व्हायरल, युजर म्हणाले….

asmrmukbangworld या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मला व्हिडीओ पाहून उलटी आली” तर एका युजरने लिहिलेय, “ज्याला मी सर्वात जास्त घाबरते, त्याला ती खात आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मी आजारी पडेल” अनेक युजर्सना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला काही युजर्सनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त करत वेगवेगळे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young girl eats snake shocking video goes viral on social media ndj