Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा विविध प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यातील बरेच व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ म्हटल्यावर युजर्सही ते आवडीने पाहतात. कारण- त्यातील अनेक गोष्टी आपल्यासाठी कधीही न पाहिलेल्या किंवा अधिक माहिती मिळवून देणारे असतात. दरम्यान, आता एक थरराक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. त्यामध्ये असं काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जंगलात असो किंवा माणसांच्या आयुष्यात असो; अनेकदा एकट्या व्यक्तीला पाहिल्यावर लोक नेहमीच त्याच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन आपला डाव साधतात. जंगलातील प्राणीदेखील एकट्या प्राण्यावर नेहमी हल्ला करण्यासाठी पुढे येतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ खूप चर्चेत असून, नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये सिंहांचा एक कळप एकट्या जिराफाला पाहून शिकार करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी ते सगळे मिळून जिराफावर हल्ला करतात. यावेळी तो जिराफही त्याच्या पायांनी सर्वांना दूर लोटण्याचा प्रयत्न करतो. परंतु, त्या बिचाऱ्या एकट्याचे सिंहांच्या कळपापुढे काहीच चालत नाही. मग सगळे जण मिळून जिराफाला खाली पाडतात आणि त्याच्या शरीराचे लचके तोडतात. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २० दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत.

हेही वाचा: “याला म्हणतात खरी भक्ती…” चिमुकल्यांनी साजरा केला स्वतःचा गणेशोत्सव; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “सण पैशाने नाही, तर…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलेय, “जिराफासारख्या मोठ्या प्राण्यालाही आपल्या कळपापासून वेगळं न होणे किती महत्त्वाचं आहे हे यावरून दिसून येते.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मला आवडलं की, हे चॅनेल त्याच्या व्हिडीओंबद्दल कधीही खोटे बोलत नाही.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मला माहीत आहे की, हा निसर्गाचा नियम आहे; पण ते पाहून मला वाईट वाटले.” आणखी एकाने लिहिलेय, “मला हे जिराफ बेशुद्ध झाल्यासारखे दिसत होते.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alone giraffes dilemma from a herd of lions video goes on viral on social media sap