Heart Stopped Working Six Times: लंडनमध्ये शिकणाऱ्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने एका धक्कादायक घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे श्रेय तो ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) ला देतो. कारण काही दिवसांपूर्वी याच सेवेतील अधिकाऱ्यांनी अतुलचे हृदय सहा वेळा बंद पडूनही त्याचा जीव वाचवला होता. नेमकी ही स्थिती काय होती व त्यातून अतुलचा जीव कसा वाचला याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अतुल राव, हा मूळचा सिएटलचा रहिवाशी आणि टेक्सासमधील बेलर विद्यापीठातील विद्यार्थी असून मागील काही दिवसांपूर्वी त्याच्याबाबत एक धक्कादायक घटना घडली. अतुलच्या फुफ्फुसात रक्ताची गुठळी तयार झाली होती ज्यामुळे त्याच्या हृदयाला होणारा रक्त प्रवाह थांबला होता या स्थितीला पल्मोनरी एम्बोलिझम म्हणतात आणि यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला.

त्याला लंडनच्या इम्पीरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्ट हॅमरस्मिथ हॉस्पिटलच्या हृदयविकाराच्या झटक्यावर उपचारासाठी असणाऱ्या केंद्रात नेल्यानंतर, फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्या हृदयातून रक्तप्रवाह रोखत असल्याची पुष्टी झाली. यामुळे त्याचे हृदय सहा वेळा बंद पडले होते पण डॉक्टरांनी तत्परतेने उपचार करून अतुलचा जीव वाचवला होता.

अतुलचं हृदय बंद पडल्यावर काय घडलं?

२७ जुलै रोजी हा एकूण प्रकार घडला होता. हृदय बंद पडल्याने कोसळलेल्या अतुलला पाहून विद्यार्थ्यांनी रुग्णवाहिका बोलावली, पण रुग्णवाहिका येण्याआधी इम्पीरियल कॉलेज लंडन येथील सुरक्षा रक्षकाने त्याला छातीवर दाब (CPR) देऊन प्राथमिक उपचार देऊ केले. रुग्णवाहिकेच्या चालकांनी म्हणजेच निक सिलेट यांनी या प्रसंगाविषयी सांगताना म्हटले की, जेव्हा मी अतुलला पाहिलं तेव्हा तो वाचेल अशीही खात्री वाटत नव्हती. त्याचा जीव वाचवणं हा माझा १८ वर्षाच्या करिअरमधला सर्वात खास क्षण ठरला आहे.”

तर, हॅमरस्मिथ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी अतुलला जिवंत ठेवण्यासाठी रात्रभर अथक परिश्रम घेतले. दुसऱ्या दिवशी त्याला एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) सिस्टीमची आवश्यकता असल्याने सेंट थॉमस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा त्याची अवस्था वाईट होती, नंतर
क्लोट-बस्टिंग औषधांनी व लाईफ सपोर्ट सिस्टीममुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

…आणि आयुष्यात मी तेव्हा जागा झालो

दरम्यान, या घटनेनंतर मागील महिन्यात अतुल आपल्या पालकांसह लंडनमधील रुग्णालयात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परतला होता. अतुल सांगतो की, वैद्यकीय विभातील शिक्षण घेतानाही मी साशंक होतो, मी व्यवसाय करावा अशीही माझी इच्छा होती पण या प्रसंगातून सावरून जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या मनाशी मी हे पक्कं केलं की मला माझ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. मला आयुष्यात दुसरी संधी मिळाली आहे आणि ती मला इतरांना मदत करून वापरायची आहे.”

हे ही वाचा<< Weight Loss: जंपिंग जॅक ठरेल वजन कमी करायची सोपी हॅक! डॉ. मेहतांकडून जाणून घ्या फायदे व प्रभावी पद्धत

तर अतुलच्या पालकांनी सुद्धा वैद्यकीय अधिकार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत हे हॉस्पिटल आमच्यासाठी मंदिरासारखे ठरले आहे असं म्हणत सर्वांचे आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul rao heart stopped working six times indian origin student alive in london these story will change your life perspective svs