Premium

शेवटी आई ती आईच..! पर्यटकांना दगड मारणाऱ्या चिपांझीला त्याच्याच आईनं बदडलं; Video पाहून नेटकऱ्यांना हसू अनावर

viral video : चिंपांझी हा सर्वात बुद्धीमान प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. अशातच एका प्राणीसंग्रहालयातील एका चिपांझी माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

chimpanzee
चिपांझीला त्याच्याच आईनं बदडलं ( Photo – Twitter)

viral video : सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यामध्ये प्राण्यांचेही काही व्हिडीओ असतात.प्राण्यांमधील मारामारी तर कधी त्यांच्यातील प्रेम असे व्हिडीओ आपण पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ लोकांना हसवतात तर काही लोकांना सरप्राईजही देतात. चिंपांझी हा सर्वात बुद्धीमान प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या प्राण्याच्या कित्येक सवयी हुबेहुब माणसांसारख्याच असतात. अशातच एका प्राणीसंग्रहालयातील एका चिपांझी माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पाहून तुम्हीही म्हणाल आई ही आईच असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई ही आईच असते –

आपली आई आपल्याला लहानपणापासून वेगवेगळ्या चांगल्या, वाईट गोष्टींबद्दल शिकवत असते. आपल्या चुका सुधारत असते आणि वेळप्रसंगी फटकेही देते. मात्र प्राण्यांच्या बाबतीत कसं असेल बरं? प्राण्यांनाही त्यांची आई बधडत असेल का? अशाच एका चिंपाझीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चिंपाझीने केलेल्या आगाऊपणामुळे त्याच्या आईने त्याला चांगलेच फटके दिलेले पाहायला मिळत आहे. तर झालं असं की, एका प्राणीसंग्रहालयात एका खडकावर ३ ते ४ चिपांझी बसले आहेत. यावेळी प्राणीसंग्रहालयात आलेल्या पर्यटकांनी चिपांझींना पाहण्यासाठी गर्दी केली. यावेळी तिथे बसलेल्या चिंपाझीने पर्यटकांवर दगडं फेकायला सुरुवात केली तेवढ्यात हे सगळं चिंपाझीच्या आईने पाहिलं आणि चिंपाझला काठीने मारायला सुरुवात केली. हे पाहून तिथे उपस्थित पर्यटकही चकीत झाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: खेकड्याशी मस्ती करणं आलं अंगलट; परत चुकूनही नाद करणार नाही…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओला आतापर्यंत ६४ हजार व्ह्युज मिळाले आहेत. तर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Baby chimpanzee hurls stones at visitors at zoo gets dose from mama instantly viral video srk

First published on: 27-03-2023 at 12:38 IST
Next Story
‘बिजली बिजली’ गाण्यावर थिरकला नीरज चोप्रा; पाहा गोल्डन बॉयचा व्हायरल व्हिडिओ