Viral kitchen video: तुम्ही नेहमीच्या अॅल्युमिनियमच्या किंवा स्टीलच्या भांड्यांपेक्षा मातीची भांडी वापरल्यास आरोग्यास ते लाभदायक ठरते. मेट्रो शहरात मातीची भांडी हळूहळू हद्दपार झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा एकदा मेट्रो शहरांमध्ये ह्या भांड्यांचा ट्रेण्ड आला आहे. मातीच्या भांड्यांमध्ये बनवलेले जेवण अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट लागते. मातीच्या तव्यावर चपाती करतांना मातीचे तत्व चपातीमध्ये शोषले जाते यामुळे त्याची पौष्टिकता वाढते.मात्र हे किती सुरक्षीत आहे ? याचा तुम्ही कधी विचार केलाय का? पण आता हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नक्कीच विचार कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुणपिढीला मातीचं भांडं काही वर्षांपूर्वी कालबाह्य वाटत होतं; पण आता बिर्याणी, कुल्फी आणि तंदुरी व कुल्हड चहा असे अनेक पदार्थ अन् पेय मातीच्या भांड्यात घेण्यास अधिक प्राधान्य तरुणपिढीकडून दिलं जातंय. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, यामध्ये एका महिलेला मातीच्या भांड्याच जेवण बनवणं चांगलंच महागात पडलं आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, चालू गॅसवर एक मातीचं भांडं ठेवलं आहे. ज्यात तुप गरम झाल्यानंतर जीरं आणि कडीपत्ता टाकला जातो. फोडणी तया करताना सगळे पदार्थ चमच्यानं ढवळत असताना अचानक मातीचं भांडं गॅसवर फुटताना दिसत आहे. अचानक किचनमध्ये धमाका होतो. मातीचं भांडं पूर्णपणे फुटतं, त्यानंतर त्याचे तुकडे इकडे तिकडे उडतात, यामध्ये जोरदार धमाका झालेला पाहायला मिळतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: लिफ्टमध्ये अडकला कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा, चिमुकल्यानं मृत्यूच्या दारातून परत आणलं; धाडस पाहून व्हाल थक्क

प्राचीन काळात स्वयंपाकासाठी मातीच्या भांड्यांचाच वापर व्हायचा. परिणामी, आहारातील पोषक घटक योग्य पद्धतीने शिजवले जाऊन त्याचा आरोग्याला फायदा होत असे; पण कालांतराने अॅल्युमिनियम, स्टील, जर्मन, तांब्याच्या भांड्यांत स्वयंपाक होऊ लागला. पुन्हा मातीच्या भांड्यांकडे लोक आता वळत आहेत. यात वेगवेगळ्या डिशना चांगलीच मागणी वाढली आहे. मात्र अशाप्रकारे जेवण बनवताना महिलांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Claypot blast while cooking food video viral on social media trending video srk