Viral Video: शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबर इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शिक्षक शाळेतील मुलांबरोबर असं काही करत आहेत, जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात; तर कधी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. त्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. असे सुंदर व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आपल्या शाळेतील सुंदर दिवस आठवतात. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची वेगळी पद्धत पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या अंगणामध्ये एक शिक्षक विद्यार्थ्यांसह डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते ‘आम्ही गड्या डोंगरचं राहणारं’ या गाण्यावर डान्स करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यी मोठ्या उत्साहात नाचत असून त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sandystorm19 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि चाळीस हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

एकाने लिहिलेय, “सलाम आहे सर तुम्हाला, नशीब लागते असे शिक्षक भेटायला”; दुसऱ्याने लिहिलेय, “ह्या इंग्लिश स्कूलच्या दुनियेतपण मराठी शाळेला अशा सरांची खूप गरज आहे.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “असले गुरुजन असतील तर महाराष्ट्रातील ग्रामीण मुले नक्कीच उत्तुंग झेप घेतली.. खूपच छान गुरू…” आणखी एकाने लिहिलेय, “सर जी, तुमच्यासारखे शिक्षक जर ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेला मिळाले तर खरंच विद्यार्थ्यांचे भाग्य उजळेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dance viral video zilla parishads school teacher and students dance on amhi gadya dongarche rahnar song sap