Desi Jugaad Video : भारतीय कधीही कोणतीही गोष्ट वाया जाऊ देत नाही. वाईट, खराब झालेल्या किंवा उपयोग नसलेल्या वस्तूंचाही पुन्हा कसा वापर करायचा हे भारतीयांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे भारतात जुगाडू लोकांची कमतरता नाही, असं म्हटलं जातं. तुम्ही परदेशात पाहिलं असेल की, लोक खराब झालेल्या वस्तू लगेच घराबाहेर काढतात; पण भारतात तसं होत नाही. लोक खराब झालेल्या वस्तूंचाही असा काही वापर करतात की, ते पाहून काहीवेळा आश्चर्यचकित व्हायला होते. सध्या असाच एक जुगाडाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात एक महिलेने जुन्या खराब झालेल्या फ्रीजचा असा काही वापर केला आहे, ज्याचा तुम्ही आयुष्यात कधी विचारही केला नसेल. त्यामुळे या जुगाडाचा व्हिडीओ पाहून युजर्सदेखील अवाक् झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल

आपल्या सर्वांना माहीत आहे की, भारतीय कोणतीही कठीणातली कठीण समस्या सोडविण्यासाठी जुगाड करतात. कधी कधी हे जुगाड इतके मजेदार असतात की, सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो खूपच अनोखा आहे. हे पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित होत आहेत.

फ्रीजला बनवले शूज रॅक

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक सामान्य घर आहे आणि त्या घरात एक जुना खराब झालेला छोटा फ्रिज ठेवलेला दिसतोय; ज्यावर आपल्या घरात ज्या प्रकारे फ्रिजवर शोभेची वस्तू ठेवतात अगदी तसाच एक फॅन्सी फ्लॉवर पॉट ठेवला आहे. त्यानंतर तिथे एक काकी येतात आणि त्या फ्रिजचा दरवाजा उघडतात. त्यांनी फ्रिजचा दरवाजा उघडल्यावर जे काही दिसते, ते पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले. कारण- फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या, मसाले, भाजीपाला किंवा इतर खाण्याचे साहित्य नाही, तर चक्क शूज भरून ठेवले होते. खराब फ्रिजचा वापर काकींनी चक्क शूज ठेवण्यासाठी केला आहे. अगदी पद्धतशीरपणे सर्व शूज फ्रीजमध्ये ठेवले आहेत. हा जुगाड पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणे कठीण होईल. कारण- असा जुगाड तुम्हीदेखील पहिल्यांदाच पाहिला असेल.

“गोवा म्हणजे पर्यटकांना जाळ्यात अडकवण्याचा सापळा”, गोव्यातील पर्यटनावर युजर्सचा संताप; म्हणाले, ‘घाणेरडे…

जुगाडाचा हा मजेशीर व्हिडीओ @laughwith_mm19 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोक भरपूर मजेशीर कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, हा सर्वांत स्वस्त आणि सुंदर जुगाड आहे. दुसऱ्याने लिहिले की, फ्रिज कदाचित म्हणत असेल की, माझ्या अधिकारांचा गैरवापर झाला आहे. त्याशिवाय इतरही अनेकांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi jugaad video woman convert old fridge into shoe rack netizens will shocked after seeing this jugaad viral video sjr