सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे खरे असतात, तर काही व्हिडीओ हे मनोरंजनासाठी तयार केले गेल असतात. पण सध्या समोर आलेला व्हिडीओ हा अगदी खरा असल्याचं सांगितलं जात आहे. प्रत्येक नात्यामध्ये प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो. चांगलं नातं निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत घ्यावी लागते, नात्यामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो. मात्र आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नवऱ्याने त्याच्या बायकोला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवऱ्यानं बायकोला रंगेहात पकडलं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरा ऑफिसला गेलेला असताना बायको तिच्या बॉयफ्रेंडला घरी बोलवते. दरम्यान बेडरुममध्ये त्यांच्या रोमांस सुरु असतानाच अचानक तिथे नवऱ्याची एन्ट्री होते आणि तो दोघांनाही रंगेहात पकडतो. हे पाहून बायको तिच्या बॉयफ्रेंडपासून लांब होते आणि बॉयफ्रेंडही तिथून निघून जातो. दरम्यान ह सगळं पाहिल्यानंतर नवरा काहीही न बोलता हताश होऊन तिथेच खोलीत बसला. एवढ्या मोठ्या चुकीबद्दल पत्नीने नवऱ्याची माफी मागितली पण तरी देखील तो काहीही बोलू शकत नव्हता. तो हे सगळं पाहून खूप नाराज झाल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: जीव वाचवणारी अँबुलन्सच उठली जीवावर, भीषण अपघातात आजोबा अन् नातू…

हा व्हिडीओ @khan0079778 नावाच्या हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे, तसेच हा खरा आहे की तो बनवला गेला आहे. हे कळू शकलेलं नाही. मात्र नेटकऱ्यांनी नवऱ्यासाठी दु:ख व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband found wife doing romance with boyfriend at home husband caught his wife with another man video viral on social media srk