viral video: आजकाल लोकांमध्ये रील्स बनवण्याची प्रचंड क्रेझ आहे. अनेकदा तर यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालण्यासही मागे-पुढे पाहात नाहीत. याच कारणामुळे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रील बनवताना मोठा अपघात झाला. मात्र तरीही लोक हे सगळं करणं सोडत नाहीत आणि निष्काळजीपणा करतात. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. पावसामुळे पुराच्या पाण्याचा जोर वाढला आणि अनेक पर्यटक अडकून पडले. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धरणावर मौजमस्ती पडली महागात

काही पर्यटक फिरायला गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र व्हिडीओ बनवण्याच्या नादात लोकांनी समोरुन येणाऱ्या मोठ्या लाटेकडे दुर्लक्ष केलं. लाट एकदम अंगावर आल्यावर पर्यटक पळायला लागले. मात्र पुढे थरारक घडलं. अचानक पाण्याची पातळी वाढली, लोकांना त्याचं गांभीर्य कळेपर्यंत पाणी वेगानं वाढलं. काही पर्यटक फिरायला गेले आहेत. ते मस्त धरणाच्या पाण्यात उभे राहून निसर्गाचा आनंद लुटत आहेत. काहीजण व्हिडीओ बनवण्यामध्ये व्यस्थ असलेले पहायला मिळत आहे. तेवढ्यात एक लाट येते. त्यानंतर व्हिडीओ बनणारे बाजूला जातात. लाटेचा वेग एवढा असतो की यामध्ये एक व्यक्ती वाहून जातो.

पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. मात्र यावेळी केलेला हलगर्जीणा जीवावर बेतू शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचामच्छर अंडी घालताना कधी पाहिलंय का? VIDEO पाहूनच हैराण व्हाल

नागरिकांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालण्याचे कोणतेही धाडस करु नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार कऱण्यात येत असते. मात्र, तरिही नागरिक याकडे सर्रास कानाडोळा करत असतात. नागरिकांनी या सर्व नियमांचे गांभीर्याने लक्ष देत पालन करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Making a video in the water of the dam was thrilling with the life shocking video viral on social media srk