Viral video: आपल्या समाजात लग्नाला खास महत्त्व आहे. लग्न हे अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज हे प्रत्येक वधू वरासाठी खास क्षण असतात. आपली मुलगी वयात आली की प्रत्येक पालकांना तिच्याबद्दल चिंता सतावू लागते. आपल्या लेकीचं लग्न थाटमाटात करावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असते. यासाठी एक वडील आयुष्यभराची कमाई लेकीच्या लग्नात खर्च करतात. तुम्ही देखील अनेक लग्नात गेले असाल. अनेक शाही लग्न देखील पाहिले असतील. मात्र असं लग्न तुम्ही कधीही पाहिलं नसेल. कारण लग्न ठरायच्या आधीच लेकीच्या लग्नासाठी वडिलांनी मोठी ऑफर दिली आहे. या वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत असून ही ऑफर ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलीचे वडील आपल्या लेकीच्या लग्नासाठी योग्य मुलाच्या शोधात आहेत. जो मुलगा या मुलीशी लग्न करेल त्याला कोट्यवधीची संपत्ती मिळणार असल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी आणि तिचे वडील दिसत आहेत. यावेळी वडील बोलत आहेत की, जो कोणी माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला ही २ करोडची हवेली आणि माझं क्लिनिक देईन. एवढचं नाहीतर ते पुढे म्हणतात याचबरोबर माझी २५ लाखांची एफडी सुद्धा मी देईन. त्यानंतर मुलगीही बोलू लागते, मला कसाही मुलगा चालेल. मग तो गोरा असो काळा असो किंवा जाड असो. मला फक्त एक हमसफर पाहिजे. जो माझी आणि माझ्या मुलीची काळजी घेईल. यावरुन कळते या मुलीचं आधी ल्गन झालेलं असून तिला एक मुलगीही आहे.

हा व्हिडीओ बनावट असल्याची शक्यता आहे. तसेच नेटकरीही व्हिडीओ बनावट असल्याचं म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! पंजा लढवताना तरुणाचा हातच मोडला; धक्कादायक घटनेचा Video पाहून येईल अंगावर काटा

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर shadi_karne_wali_girls नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या अकाऊंटवरुन असा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील असे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी याला फेक व्हिडीओ बोलत आहेत. तर, काहीजण ही फसवणूक असल्याचं बोलत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man offering his property to person who will marry his daughter video goes viral srk