अंकिता देशकर

Arvind Kejriwal Degree: द इंडियन एक्सप्रेस ला दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बद्दल एक दावा सोशल मीडिया वर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. असा दावा करण्यात येत आहे कि अरविंद केजरीवाल यांनी जॉईंट एंट्रन्स एक्सामीनाशन (JEE) परीक्षा पास न करता एका कॉर्पोरेट कोटा मधून ऍडमिशन केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही सोशल मीडिया पोस्ट मध्ये अरविंद केजरीवाल यांचे जुने चित्र देखील या दाव्यासह व्हायरल होत आहे. तर काही पोस्ट मध्ये एक जुनी आरटीआय कॉपी देखील शेअर करण्यात येत आहे. द इंडियन एक्सप्रेस च्या तपासात हा व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.

दावा:

तपास:

द इंडियन एक्सप्रेसने तपासाची सुरुवात गूगल किवर्ड सर्च चा वापर करून केली. आम्हाला आमच्या तपासात एक रिपोर्ट सापडला ज्याचे शीर्षक होते: “केजरीवाल यांना आयआयटीमध्ये रँक नाही, त्यांनी ‘इतर’ पद्धतींनी प्रवेश मिळवला: स्वामी”. हा रिपोर्ट २५ जून २०१६ रोजी प्रकाशित कारण्यात आला होता. या रिपोर्ट मध्ये म्हटले होते, “केजरीवाल यांच्या IIT-K मध्ये प्रवेशाबाबतच्या आरटीआय उत्तराची एक प्रत पोस्ट केली आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की आप प्रमुखांच्या रँक कार्डची कोणतीही नोंद नाही तर अन्य अनेक विद्यार्थ्यांचे हे तपशील उपलब्ध आहेत’.

यानंतर आम्हाला, डेक्कन हेराल्ड मध्ये प्रकाशित एक रिपोर्ट सापडला ज्याचे शीर्षक होते, “केजरीवाल यांना JEE मध्ये 563 रँक मिळाल्याचे संस्थेने म्हटले आहे” हा रिपोर्ट १० जुलै २०१६ ला प्रकाशित करण्यात आला होता.

या रिपोर्ट मध्ये म्हटले होते: उपलब्ध नोंदीनुसार, अरविंद कुमार केजरीवाल, रोल नंबर 8526118 यांना आयआयटी-जेईई द्वारे यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी टेक (एच) पदवीमध्ये प्रवेश मिळाला होता. अरविंद कुमार केजरीवाल यांच्यासह अशा जुन्या सत्रासाठी (१९८५ – ८९) प्रवेश घेतलेल्या सर्व उमेदवारांचे ऑल इंडिया रँक कार्ड सापडत नव्हते. पण, प्रवेश नोंदवहीवरून शोध घेतल्यावर असे आढळून आले की केजरीवाल यांचा अखिल भारतीय रँक ५६३ आहे,” असे संस्थेचे उपनिबंधक आणि जन माहिती अधिकारी डॉ. अनाथबंधू पात्रा यांनी त्यांच्या उत्तरात सांगितले.

आम्हाला युट्युब वर एनडीटीव्ही च्या ऑफिशिअल हॅन्डल वर एक व्हिडिओ देखील सापडला, व्हिडिओ चे शीर्षक होते: Arvind Kejriwal Cites IIT-JEE Rank For “Make Indians Rich” Formula ते एक मिनिट २५ सेकंदांवर म्हणताना दिसतात कि त्यांचा IIT JEE रँक ५६३ आहे.

तसेच आम्हाला फेसबुक वर एक व्हिडिओ ABP Live च्या पेज वर सापडला. या व्हिडिओ मध्ये, IIT खरगपूर चे तेव्हाचे रेजिस्ट्रार प्रदीप पेने यांनी अरविंद केजरीवाल चे प्रवेश कुठल्याहि कॉर्पोरेट कोटा मधून झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी हे देखील मान्य केले कि केजरीवाल यांचा ऑल इंडिया रँक ५६३ होता.

जेव्हा आम्ही आरटीआयचे उत्तर ऑनलाइन शोधले तेव्हा आम्हाला ‘Quora’ वर अभिषेक मोडक यांची पोस्ट सापडली, जे एक आरटीआय कार्यकर्ते आहे. त्यांनी आरटीआय उत्तराचे फोटो शेअर केले आहेत. ‘अरविंद केजरीवाल यांनी आयआयटी-जेईईमध्ये एआयआर- ५६३ रँक मिळवला आणि मेलानिकेल बीटेकमध्ये सीजीपीए मिळवले. १९८५ – ८९ मध्ये IIT-KGP मध्ये ८. ४२ CGPA मिळवून अभियांत्रिकी पूर्ण केली. आयआयटी-केजीपीकडे दाखल केलेल्या आरटीआय अर्जात माहिती उघड झाली आहे.

अभिषेक मोडक यांनी आम्हाला पुष्टी केली की त्यांनी स्वतः आरटीआय दाखल केला होता आणि त्यांना आयआयटी खरगपूरकडून उत्तर मिळाले होते.

इंडियन एक्स्प्रेसने आयआयटी खरगपूर येथील माजी अधिकाऱ्यांशीही याबाबत संवाद साधला. अभियांत्रिकी विभागासाठी असा कोणताही प्रवेश कोटा अस्तित्वात असल्याची माहिती त्यांना नसल्याचे त्यांनी सांगितले. पण, आम्ही IIT खरगपूरच्या औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत.

हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क

निष्कर्ष: दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी IIT JEE परीक्षा दिली. एका आरटीआय उत्तराप्रमाणे, त्यांचा JEE रँक ५६३ आहे. व्हायरल होत असलेले दावे, ज्यात सांगण्यात येत आहे कि त्यांना परीक्षा देऊन प्रवेश नाही मिळाला, ते खोटे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi degree then arvind kejriwal educational qualification controversy viral post says got into iit without jee svs