सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशात अनेक महानग प्रसिध्दीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात. यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात. तर काहींना जन्माची अद्दल घडते. अशातच तुम्ही आतापर्यंत तरुणांना चालत्या बाईकवर स्टंटबाजी करताना पाहिलं असेल मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की डोक्याला हा लावाल. कारण या व्हिडीओमध्ये चक्क एक वृद्ध व्यक्ती चालत्या बाईकवर स्टंटबाजी करतोय. त्यानं भरदाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा बिंधास्त दुचाकीवर स्टंटबाजी करत आहेत. ते कधी दोन्ही हात सोडून गाडी चालवत आहेत, तर कधी हात वर करुन स्टंट करत आहेत. एवढंच नाही तर, आजोबा कधी गाडीचा हँडल सोडत आहेत. कधी त्या गाडीवर झोपतं आहेत. कधी त्या गाडीवर डान्स सुध्दा करीत आहेत. त्यामुळे आजोबांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. यावेळी अपघात, दर्घटना होण्याची भीती आहे मात्र हे आजोबा वाहतुकीचे नियम तोडून सर्रास स्टंटबाजी करत आहेत. थोडाजरी तोल गेला तरी आजोबांचा मोठा अपघात होऊ शकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIRAL VIDEO: कधी गळा दाबायची तर कधी…तरुणीनं शेअर केला समलैंगिक लव्हस्टोरीचा भयानक अनुभव

आजोबांना या वयात असे स्टंट करताना पाहून बहुतेक युजर्स फनी प्रतिक्रिया देत आहेत. या वयात पडले तर हाडेही जुळणार नाहीत, असे एका यूजरने लिहीले आहे. त्याचवेळी, एका यूजरने या वयात असे अप्रतिम स्टंट करणार्‍या वृद्ध व्यक्तीचे कौतुक केले आहे आणि या वयात असे स्टंट करणे ही स्वतःमध्ये मोठी गोष्ट असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old man dangerous stunt on bike video dangerous stunt on bike video viral on social media srk