एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला उत्तर देणारा राज ठाकरेंचा जुना VIDEO VIRAL

‘वेळ प्रत्येकाची येते!’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय. मी हे कधीच विसरणार नाही. आणि मी विसरलेलो नाही, हे त्यांना भविष्यात कळेल” असंही राज ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणाले होते.

Raj-Thackeray-Old-Video-Viral

Maharashtra political crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. मुंबई महापालिकेतील सत्ताकारणात ऑक्टोबर २०१७ मध्ये मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवक फोडून शिवसेनेनं महापालिकेतली सत्ता टिकवण्यासाठी खेळी खेळली होती. त्यावेळी राज ठाकरे शिवसेनेला उद्देशून बोलतानाचा हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होऊ लागलाय. ‘वेळ प्रत्येकाची येते!’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय. 

‘राजसाहेबांच्या कठीण काळात उद्धव ठाकरेंनी नीच राजकारण करून मनसेचे ६ नगरसेवक फोडले, आज त्यांच्याच अख्खा पक्ष फुटण्याच्या मार्गावर आहे, वेळ प्रत्येकाची येते उद्धवजी…’ असं या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आलंय. मुंबई महापालिकेच्या सत्ताकारणाच्या वेळी शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. “मी शिवसेनेतून ज्या वेळेला बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा मी बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो. हे उद्धव वगैरे आहेत ना त्यांच्या या नीच राजकारणाचा मला कंटाळा आला होता, म्हणून मी बाहेर पडलो. मी जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा शिवसेनेतील अनेक आमदार, नगरसेवक माझ्यासोबत बाहेर पडायला तयार होते, पण तेव्हा मी सांगितलं होतं, की मला पक्ष फोडून माझा पक्ष उभारायचा नाही. या गोष्टी मला करायच्या नाहीत, मी करणारही नाही. पक्ष स्थापनेच्या वेळीही, कोणालाही विचारुन बघा, मी एकालाही फोनही केला नव्हता. त्यानंतर मी बाहेर पडल्यावर जे प्रेमाने येतील, ते माझ्यासोबत राहतील. त्यामुळे असलं घाणेरडं राजकारण मी कधी केलं नाही, करणारही नाही” असं राज ठाकरे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत.

आणखी वाचा : ढग कसे बनतात? हे जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

“आजपर्यंत या लोकांना मी अनेक वेळा मदत करत आलो. पण हे असलं राजकारण बाळासाहेबांनी कधी शिकवलं नाही. बाळासाहेब जसे वागायचे, त्यांनी जे शिकवलं ते मी आत्मसात केलं आहे, उद्धव आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून अत्यंत नीच अशी खेळी खेळली गेली. महाराष्ट्रातील जनता हे विसरणार नाही, आणि मी हे कधीच विसरणार नाही. आणि मी विसरलेलो नाही, हे त्यांना भविष्यात कळेल” असंही राज ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणाले होते. 

आणखी वाचा : शेतकरी रॅंचो! ‘जुगाड’ गहू कापणी यंत्र तयार केले; पाहा हा VIRAL VIDEO

त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचं वातावरण रंगलेलं असताना मनसैनिकांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. हा व्हिडीओ पाहून ‘जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ’ ही म्हण तोंडावर आल्याशिवाय राहत नाही.

आणखी वाचा : मुंबईच्या रस्त्यावर तरूणींचा फ्लॅश मॉब, ‘इन डा गेटो’ वर केलेल्या दमदार परफॉर्मन्सचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : न्यूयॉर्कमधील सुंदर सनसेट टिपण्यासाठी लोकांनी वाहतूकच थांबवली, १० मिलियनहून अधिक व्ह्यूज

नक्की काय घडलं होतं?

२०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकचा फरक होता. त्यामुळं मनसेच्या नगरसेवकांना फोडून शिवसेनेन मुंबई पालिकेतील स्थान मजबूत केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray old video viral cm uddhav thackeray shivsena after eknath shinde rebels prp

Next Story
मुंबईच्या रस्त्यावर तरूणींचा फ्लॅश मॉब, ‘इन डा गेटो’ वर केलेल्या दमदार परफॉर्मन्सचा VIDEO VIRAL
फोटो गॅलरी