shocking video man is seen lighting a cigarette by creating a spark from high voltage current flowing in electric wires | Loksatta

Video: वीज कर्मचाऱ्याचा जीवघेणा स्टंट, हजारो व्होल्ट्सच्या तारांनी सिगारेट पेटवायला गेला अन्…

व्हायरल व्हिडीओतील एका व्यक्तीने जीवघेणा स्टंट केला आहे. जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत

Viral Video of Smoking
काही व्यसनी लोकांना वेळेवर सिगारेट भेटली नाही तर ते अस्वस्थ होतात. (Photo : Twitter)

काही लोकांना व्यसन करण्याची सवय असते, या सवयींमध्ये सिगारेट पिण्याची सवय अनेकांना असते. त्यांना जर वेळेवर सिगारेट भेटली नाही तर ते अस्वस्थ होतात. सध्या अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिगारेट पेटवण्याठी त्याने अनोखा आणि जीवघेणा स्टंट केला आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी धुम्रपान करणाऱ्या लोकांजवळ सिगारेट असते पण काडीपेटी आणि लायटर नसतो. अशावेळी ते सिगारेट पेटवण्यासाठी काहीतरी जुगाड करत असतात. सध्या अशाच एका व्यक्तीने आपली सिगारेट पेटवण्यासाठी असं काही केलं आहे, ज्याचा अंदाजदेखील आपणाला लावता येणार नाही.

हेही वाचा- विंडो सीटसाठी पैसे दिले अन् विमानात गेला तर खिडकी गायब; ‘या’ प्रवाशासोबत घडलेला किस्सा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

‘स्मोकिंग किल्स’ सोबतच सिगारेटच्या पेट्यांवर ‘धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे’ असा इशारा दिलेला असतो. कारण तंबाखूमध्ये आढळणाऱ्या निकोटीनमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सिगारेट पिणे टाळण्यास सांगितले जाते तरीही लोक ऐकत नाहीत. सध्या सोशल मीडियावर असात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांनी धुम्रपान वाईट आहेच शिवाय ती करण्याची पद्धतही चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. कारण या व्हिडीओतील व्यक्तीने जीवघेणा स्टंट केला आहे. जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

वीजेच्या तारांनी पेटवली सिगारेट –

हेही वाचा- “माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ ‘1000 वेज टू डाय’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये वीज विभागातील एक कर्मचारी तोंडात सिगारेट घेऊन वीजेची तारा एकमेकांजवळ आणून त्यातून निर्माण झालेल्या ठिणगीने पेटवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. को आतापर्यंत ४ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी या व्हिडीओतील व्यक्तीला ‘खतरों का खिलाडी’ असल्याचं म्हणत आहेत..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 12:56 IST
Next Story
VIDEO: महेंद्रसिंग धोनीची तब्बल २ वर्षांनी पोस्ट, मजेशीर कमेंट करत रविंद्र जडेजा म्हणाले, “ट्रॅक्टरला…”