scorecardresearch

“माझी काडीपेटी परत करा अन्यथा…” वीज विभागाच्या कार्यालयात डेंजर वाद; Viral पत्र पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल होत असलेल्या पत्रात १९ काड्या शिल्लक असलेली काडीपेटी परत करण्यासाठीचा अल्टीमेटम दिला आहे

viral Letter about matchbox
अनेकदा आपण दुसऱ्यांकडून घेतलेली एखादी वस्तू किरकोळ समजून विसरुन जातो. (Photo : Twitter)

अनेकदा ऑफिसमध्ये एकत्र करणारे सहकारी एकमेकांच्या वस्तू वापरत असतात. कधी ते आपल्या सहकाऱ्याचा मोबाईल चार्जर तर कधी पाण्याची बॉटलही एकमेकांमध्ये शेअर करत असतात. शाळा, कॉलेजपासून ते ऑफिसमध्ये अनेकांना आपल्या शेजारी बसणाऱ्या सहकाऱ्याची कधी ना कधी मदत घ्यावी लागतेच. तुम्हीही अनेकदा तुमच्या शेजारी बसणाऱ्या सहकाऱ्याकडून पेन किंवा एखादी वस्तू घेतली असेल आणि ती परत करायला विसरुन गेला असाल.

अशा वस्तू देणारा अनेकदा ‘माझी वस्तू परत दे’ अशी आठवणही करुन देतो. तर अनेकदा आपण दुसऱ्यांकडून घेतलेली वस्तू किरकोळ समजून विसरुन जातो. मात्र, ती ज्याची वस्तू असते तो मात्र कधीच विसरत नही. मग ती एखादी वस्तू असो वा उसने दिलेले पैसे. सध्या अशाच एका घटनेचं पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहून तुम्हाला हसू आवरणं कठिण होणार आहे.

हेही पाहा- Video: पुजेदरम्यान घंटी सापडली नाही म्हणून तरुणाने केला भलता जुगाड, नेटकरी म्हणाले “अरे देवाला तरी…”

या पत्रामध्ये १९ काड्यांची काडीपेटी परत करण्याची विनंती केली आहे. शिवाय ती वेळेत मागे दिली नाही तर कारवाई करण्याचा इशाराही या पत्रात दिला आहे. त्यामुळे हे पत्र पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर हे पत्र वाचून सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय ठरला आहे.

पत्र व्हायरल –

हेही पाहा- दुधाची किटली आणि ट्रॅक्टरच्या सायलेन्सरचा वापर करुन ‘या’ पठ्ठ्याने बनवली अनोखी बाईक; पाहा Viral Video

व्हायरल होत असलेल्या या पत्रातील मजकुरानुसार हे पत्र उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील विद्युत विभागातील आहे. या विभागाच्या एका व्यक्तीने कार्यालयातील काडीपेटी घेतली आणि ती परत करायला विसरला, शिवाय ती काडीपेटी परत करण्यासाठी कार्यालयाच्या अधिकाऱ्याने एक पत्र लिहिलं आहे. ते व्हायरल पत्र पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आपलं हसू आवरणं कठिण होत आहे. शिवाय ही घटना जुनी असली तरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.

३ दिवसांची मुदत –

पत्रातील मजकुरानुसार, २३ जानेवारी रोजी विद्युत विभागाच्या कार्यालय सहाय्यकाने कार्यालयात ठेवलेली काडीपेटी घेतली होती. ज्यामध्ये १९ काड्या शिल्लक होत्या. मात्र या सहाय्यकाने ती काडीपेटी परत केली नाही. त्यावर सहायक अभियंत्याने त्यांना पत्र लिहून १५ दिवसांचा अल्टिमेटम देत काडीपेटी परत करण्यास सांगितली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ते वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 16:27 IST
ताज्या बातम्या