Mother son video: आपण श्रावणबाळाची कथा ऐकलीच असेल. श्रावण आई-वडिलांना कावडीत बसवून कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता. आजच्या काळात असा श्रावणबाळ पाहायला मिळणं फार कठीण आहे, हे आपण केवळ ऐकलेलं आहे. पण, आजचा आधुनिक श्रावण बाळ कसा असू शकतो किंवा कसा आहे, हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव हा एका मंदिरामध्ये अनुभवायला मिळाला आहे. अशी अनेक मुलं असतात जी आपल्या पालकांना अत्यंत जीवापाड जपतात. याच श्रावणबाळाची आठवण करून देणारी एक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये. मात्र हीच आई जेव्हा म्हातारी होते तेव्हा तिच्यासारखी माया तिच्यावर कुणी करत का? तिने ज्या प्रेमाने मायेनं आपल्या मुला-बाळांना वाढवलं ती मुलं आईच्या म्हातारपणी तिच्यातलं लहान मुलं जपतात का? आज वृद्धाश्रमात अनेक वयस्कर लोक लेकरांच्या आशेने हताश बसलेली पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यात असं एक चित्र दिसतं जे मन सुखावणारं असतं. एका मुलानं त्याच्या वय झालेल्या देवासमान आईला कडेवर घेऊन देवाचं दर्शन घडवलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्यक्तीनं आई नावाच्या देवाला मंदिरातला देव दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आपल्या वय झाल्यानं चालता न येणाऱ्या आईला कडेवर घेत देवदर्शनासाठी आणलं आहे. मंदिर परिसरात ते त्यांच्या आईला देवाचं दर्शन घडवण्यासाठी घेऊन आले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “भावकी…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की लोक म्हणाले, ‘बरोबर बोललास भाऊ…’ PHOTO पाहून तुम्हीही हसाल

व्हायरल व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर kutuhal.news या हँडलसह शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत यूजरने लिहिले – कडेवर घेऊन जग दाखवणाऱ्या आई नावाच्या देवाला त्याने मंदिरातला देव दाखवा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले “अशी मुलं असतील तर कोणतीच आई वृद्ध आश्रमात नसेल.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son showed the god to his mother video will bring tears to the eyes of every mother and child srk