Varanasi Cricket Match Viral Video:  क्रिकेट हा भारतासह अनेक देशांमधील एक लोकप्रिय खेळ आहे. यात भारतात क्रिकेटप्रेमींची काहीच कमी नाही, आजही अनेक भारतीय तरुणांसाठी क्रिकेट हे पहिलं प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला गल्लीबोळात फिरताना क्रिकेट खेळणारे अनेक तरुण दिसतील. पण, उत्तर प्रदेशातील वाराणसीतील एका क्रिकेट मैदानात एक अनोखा क्रिकेट सामना पाहायला मिळाला. वेदपाठीचे विद्यार्थी (बटुक) चक्क पारंपरिक भगव्या रंगाचे धोतर-कुर्ता अन् कपाळावर टिळा लावून क्रिकेट खेळताना दिसले. इतकेच नाही तर क्रिकेट कॉमेंट्री इंग्रजी, हिंदी, मराठी नाही तर चक्क संस्कृत भाषेत सुरू होती. या अनोख्या क्रिकेट सामन्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेदपाठीचे हे विद्यार्थी पारंपरिक पोशाखात क्रिकेटचा आनंद घेत होते. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी समर्पित असलेल्या श्री शास्त्रार्थ महाविद्यालयाच्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) या संस्कृत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. रामपुरामधील जयनारायण इंटर कॉलेज मैदानात हा क्रिकेट सामना रंगला.

व्हि़डीओत तुम्ही पाहू शकता की, वेदपाठीचे विद्यार्थी (बटुक- गुरुकुलात शिकणारे ब्राह्मण) भगव्या आणि पिवळ्या रंगाचे धोतर, अंगावर भवगे वस्त्र आणि कपाळी चंदन टिळा लावून क्रिकेटच्या मैदानात उतरले. यावेळी बटुकांनी मंगलाचरण आणि वैदिक मंत्रांचे पठण करत मैदानात प्रवेश केला. यादरम्यान आघाडीच्या फलंदाजांनी अनेक चौकार आणि षटकार ठोकत शानदार सामना खेळला. सामना सुरू होता तेव्हा माईकद्वारे हिंदी, इंग्रजी नाही तर चक्क संस्कृत भाषेत कॉमेंट्री सुरू होती. यावेळी चौकार, षटकारांवर सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. अनेक लोक हा अनोखा क्रिकेट सामना पाहण्यासाठी आले होते.

आता हे काय नवीन! नवरदेव लग्नासाठी निघालाय की दुकानातलं सामान विकायला? Video पाहून तुम्हीपण हसाल

दरवर्षी असा अनोखा क्रिकेट सामना फक्त काशीमध्ये आयोजित केला जातो, त्यामुळे २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ‘मन की बात’मध्ये काशीच्या या अनोख्या संस्कृत क्रिकेट सामन्याचे कौतुक केले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique match in varanasi batuk played cricket wearing dhoti kurta video of commentary in sanskrit goes viral sjr