Delhi Metro Bikini Girl Viral Video: दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनीपेक्षाही तोकडे कपडे घालून फिरणाऱ्या तरुणीची मागील कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. या तरुणीचे नाव रिदम चन्ना असे असून ती अवघ्या १९ वर्षाची आहे. रिदमचा मेट्रोमधील अवतार अश्लील असल्याचे म्हणत अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. काहींनी तिची तुलना उर्फी जावेदशी करून अनेकांनी तिच्या घरच्यांना काही वाटत नाही का असेही प्रश्न विचारले होते. अखेरीस आता रिदमनेच एका रीलमधून अप्रत्यक्षपणे सर्व ट्रोलर्सना उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत रिदम चन्नाने सांगितलं होतं की, “मी काय परिधान करायचं? हे माझं स्वातंत्र्य आहे. हे मी पब्लिसिटी स्टंट किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाहीये. माझ्या कपड्यांबद्दल लोकांना काय वाटतं? याची मला पर्वा नाही. माझे कुटुंबीय माझ्या कपड्यांच्या निवडीवर नाखूश आहेत. मला माझ्या शेजाऱ्यांकडून नियमित धमक्या मिळतात. पण लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? याची मला पर्वा नाही” असंही रिदमने पुढे सांगितलं.

आता पुन्हा एकदा रिदमने इंस्टाग्रामवर एक रील बनवून पोस्ट केली आहे आहे. लोकं मला ट्रोल करताना माझ्या मनात काय असतं आणि मी मुळात काय बोलते असे दाखवणारा हा व्हिडीओ होता. यात आधी ती म्हणते की, “त्यातही ती लोकांना तुम्ही मला बोलण्याआधी स्वतःचं तोंड बघा मी तुमच्यापेक्षा १००० पट सुंदर आहे. तुम्ही आहातच कोण मला बोलणारे?” तर दुसऱ्या भागात ती फक्त डोळे फिरवून ट्रोलर्सवर हसून दाखवतेय.

Video: बिकिनी गर्ल रिदम चन्ना

हे ही वाचा<< “मी बिकिनी घालते कारण घरी…” मेट्रोमधील व्हायरल बिकिनी गर्लने केला खासगी आयुष्याचा उलगडा; म्हणते, “उर्फी..”

दरम्यान रिदमच्या व्हिडिओपेक्षा भन्नाट कॉन्टेन्ट तिच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळत आहे. तू तुझं तोंड बघ, २०० किलो मेकअप करूनही तू काय दिसतेस आणि कोणाला काय बोलतेस? फॅशनच्या नावावर नग्नता करून लोकांना लाज शिकवणारी तू आहेसच कोण? देव ही विचार करत असेल मी कोणत्या लोकांना पृथ्वीवर पाठवलं आहे. अशा कमेंटने रिदमच्या व्हिडिओची रिच प्रचंड वाढवली आहे. तुम्हाला तिच्या या व्हिडिओवर काय वाटते हे कमेंटमध्ये कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video delhi metro girl half naked travel rhythm channa says i am thousand times better than you netizens got angry svs