Viral Video : सोशल मीडियावर जवानांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुटुंबाला सोडून देशाचे रक्षण करण्यासाठी जाणाऱ्या जवानांचे त्यांच्या कुटुंबाबरोबरचे भावुक क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच काही जुने आणि नवीन व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही जवान सीमेवर चपाती बनवताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका केव्हाचा आहे आणि कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही जवान दगडाची चूल तयार करून त्यावर चपाती बनवताना दिसत आहे. एकजण मळलेल्या पीठाचे गोळे बनवताना दिसत आहे तर एकजण चपाती लाटत आहे आणि एक जण चपाती भाजताना दिसत आहे. काही जवान इतर कामे करत आहे. या जवानांना पाहून तुम्हीही भावुक व्हाल. आपण सुखरूप राहावे म्हणून हे जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. आपल्यासाठी त्याग करतात. आपण चमचमीत खातो पण हे जवान सीमेवर हलाखीच्या परिस्थितीत मिळेल तसं बनवून खातात. हा व्हिडीओ पाहून या भारतीय जवानांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी हे जवान प्रत्येक गोष्टीचा सामना करतात आणि परिस्थितीला सामोरे जातात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
_cute_foji01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारतीय जवान खूप मेहनती आहे. सलाम तुम्हाला. तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत.” तर एका युजरने लिहिलेय, “तुमचं कौतुक करावं तितकं कमी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तुम्हाला असं बघून डोळे भरून आले” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर जवानांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.