Teacher Dancing Viral Video: शिवपुरी जिल्ह्यातील करेरा ब्लॉकमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक महिला शिक्षिका CCLE प्रशिक्षण कार्यक्रमात पुरुष सहकाऱ्यासह बॉलीवूड बीट्सवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ १६ मे चा आहे आणि सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील असल्याचे समजतेय. इथे सरकारी हायस्कूल आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना CCLE तर्फे प्रशिक्षण दिले जात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या CCLE प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांना सतत आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे हा होता. तसेच, वर्गातील मनोरंजक आणि आनंददायक वातावरणात त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी एक खेळीमेळीचे वातावरण तयार केले जात होते. हे सत्र सुरु असताना या शिक्षिकेने ‘आपके आ जाने से’ या बॉलीवूड गाण्यावर कमाल मूव्ह्ज दाखवल्या. नंतर, अजून एक शिक्षक देखील तिथे मॅडमच्या स्टेप्सच्या तोडीस तोड नाचू लागले आणि कर्मचारी सदस्यांनी सुद्धा शिट्ट्या वाजवून त्या दोघांचे कौतुक केले.

Video: भरवर्गात मॅडम सर थिरकले आणि मग..

हे ही वाचा<< “वर्दी काढून ये मग… ” मुस्लिम वृद्ध व्यक्तीची पोलिसांना धमकी; ‘हा’ Video व्हायरल होताच समोर आला खरा प्रकार

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींनी या खेळकर शिक्षकांचे कौतुक केले आहे. शाळा म्हणजे शिक्षा नाही हसत खेळात, गाऊन- नाचून विद्यार्थ्यांना शिकवल्यास त्यांना समजण्यास मदत होऊ शकते असेही काहीजण म्हणत आहेत. तर काहींनी मात्र, शिक्षकांनी असं नाचून विद्यार्थ्यांना रील कसं बनवायचं एवढंच शिक्षण देता येईल. आपल्या पदाची मान- मर्यादा ओळखायला हवी असे म्हणत काहींनी यावर ताशेरे ओढले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video school lady teacher dance in training session in black saree on romantic song belly dance shocks trainers svs