Video Shows Man Suggested How God Might Have Created The Mumbai City : मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराचे वर्णन करायला सांगितले, तर ते तुम्ही कसे कराल? थोडे अवघड आहे ना? कारण- प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून मुंबई शहराची स्वतःची एक वेगळी व्याख्या असणार आहे. मात्र, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये तुषार राय नावाच्या इन्स्टाग्राम युजरने मुंबईसाठी एक रील बनवली आहे. व्हिडीओमध्ये (Video) मुंबई हे शहर बनवताना देवाने कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्यात याबद्दल थोडक्यात सांगितले आहे. वाहतुकीपासून हवामानापर्यंत, या रीलमध्ये मुंबईबद्दल अनेक गोष्टी सामाविष्ट करणयात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवाने मुंबई कशी बनवली?

‘देवाने मुंबई कशी निर्माण केली’ असे या रीलचे शीर्षक होते. शहरातील जागेच्या समस्यांकडे लक्ष वेधून, ‘मुंबई? मुंबईमध्ये जागा कमी आणि लोक जास्त, रिक्षा, बेस्ट, मोनो रेल, मेट्रो, लोकल, टॅक्सी जवळपास वाहतुकीची सर्वच साधने आहेत. पण, रिक्षा मात्र मीटरवरच धावते. वातावरणाबद्दल सांगायचे झाल्यास उन्हाळ्यात प्रचंड उकाडा असतो. तर, हिवाळ्यात पहाटे ५ व रात्री १२ वाजता थंडी आणि मग पूर्ण दिवस ऊन असते. तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि हो ऑक्टोबरमध्येही पाऊस, असे देवाने मुंबईला बनवल्याचे या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. तुम्हीसुद्धा बघा हा खास व्हायरल व्हिडीओ (Video) …

व्हिडीओ नक्की बघा…

आमची मुंबई

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, मुंबई शहराचे निरीक्षण करून, अगदी हुबेहूब वर्णन या व्हिडीओत करण्यात आले आहे. त्यामध्ये वाहतूक, वातावरण, राहणीमान आणि दिल्लीपेक्षा जास्त चांगले पदार्थ मुंबईत, मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर खड्डे, मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांना ‘मुंबादेवी’चे दर्शन घेण्यासाठी मशीद बंदरला उतरावे लागेल, तर हाजी अली दर्ग्याला भेट देण्यासाठी महालक्ष्मी रेल्वेस्थानकावर उतरावे लागेल आदी गोष्टी या व्हिडीओत सांगण्यात आल्या आहेत; ज्या तुम्हालासुद्धा पटतील.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @nustatushar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा इन्स्टाग्राम युजरचे कौतुक करताना दिसत आहेत. आमची मुंबई, मला मुंबईकर असल्याचा अभिमान आहे, मुंबई मेरी जान, रिक्षा मीटवर चालणार हे बेस्ट होते, ऑक्टोबरमध्ये पाऊस पडणे तर निश्चित आहे, बेस्ट व्हिडीओ, आमच्या मुंबईत असेच असते आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video shows instagram user named tushar rai suggested how god created mumbai has caught the attention of netizens asp