सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ हे खळखळून हसवणारे आणि काही व्हिडीओ डोळ्यात अश्रू आणणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर काळजाचे ठोके चुकतात. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, कारण या व्हिडीओमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. या व्हिडीओमधला प्रसंग जिच्यासोबत घडलाय तिचा नक्कीच काळजाचा ठोका चुकला असेल. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एकदा बदकाचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अक्षरशः पोट धरून हसत आहेत. एका पार्कींग एरियामधून जाणाऱ्या महिलेवर या बदकाने हल्ला केल्याचं दिसून येत आहे. हा बदक थेट या महिलेच्या डोक्यावर येऊन हल्ला करू लागतो. अचानक आपल्या डोक्यावर बदक येऊन करत असलेला हल्ला पाहून महिला देखील घाबरून जाते. बदकाचा हल्ला होताच ही महिला पार्किंग एरियामध्ये इथे तिथे पळू लागते. जस जशी ही महिला पळते तिच्या मागोमाग हे बदक तिचा पाठपाग करताना दिसून येतो. या बदकाच्या हल्ल्याला ही महिला इतकी घाबरते की पळता पळता ती आपल्या हातातले सर्व साहित्य फेकून देते आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नियमांची ‘ऐशी तैशी’! थेट बंदूक घेऊन कार्यक्रमात पोहोचला हा व्यक्ती, भरपूर नाचला पण आता….

या व्हिडीओमध्ये बदकाच्या हल्ल्यापासून ही महिला स्वतःला वाचवते. पण शांतपणे चालत असलेल्या या महिलेवर बदकाने अचानक का बरं हल्ला केला असेल? असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगतो. खरं तर या बदकाने त्याच्या साथीदाराच्या घरट्यांचं संरक्षण करण्यसाठी हा हल्ला केला होता. ही महिला जिथून जात होती त्याच्या जवळच असलेल्या झाडावर हे घरटं होतं. तिथून जाणारी ही महिलेकडून आपल्या साथीदाराच्या घरट्याला धोका असल्याचं या बदकाला वाटलं होतं. म्हणून या बदकाने महिलेवर हल्ला केला.

आणखी वाचा : नागिन डान्सनंतर आता मार्केटमध्ये आला ‘आर्मी’ डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : काश्मीरला गेलेल्या मुलीला ही गोष्ट बघायला मिळालीच नाही, पाहा हा VIRAL VIDEO

ही घटना अमेरिकेतल्या फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिलमध्ये घडली आणि व्हिक्टोरिया विलार्ड नावाच्या युजरने १६ एप्रिल रोजी ती क्लिप टिकटॉकवर पोस्ट केली. फॉक्स 5 नुसार, एका पुरुषाने महिलेला तिचे सामान परत आणण्यास मदत केली. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर करताना दिसून येत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बदकासोबत खेळू नये.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video duck suddenly attack a woman going near the nest trending news prp