बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा प्रत्येक चाहता अभिनेत्याला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आणि भेटून संवाद साधण्याचे स्वप्न बघत असतात. इतकेच नाही तर अनेक उत्साही चाहते अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर उभे असतात. पण, यातील काहीच चाहत्यांना शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळते. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक कुटुंब शाहरुख खानला भेटण्यासाठी खास त्यांच्या चिमुकलीला बरोबर घेऊन जातात.
एक कुटुंब त्यांच्या चिमुकलीला घेऊन शाहरुख खानचा बंगला मन्नतवर जाण्यासाठी तयार असतात. बराच वेळ प्रवास करून ते मन्नत बंगल्याजवळ पोहचतात. तसेच काही वेळाने बॉलिवूड स्टार शाहरुख खान त्याच्या बंगल्यामधून बाहेर येतो आणि कुटुंबाला भेटतो. तसेच शाहरुख खान आई-बाबा आणि चिमुकली बरोबर खास फोटो काढतो. तसेच कुटुंब शाहरुख खानच्या डंकी चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्याला खास गिफ्ट सुद्धा घेऊन जातात. कुटुंबाची शाहरुख खान बरोबर अनोखी भेट एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून नक्की बघा.
हेही वाचा… सकाळी शेअर मार्केट अन् दिवसभर रिक्षा; ट्रेडर रिक्षाचालकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
पोस्ट नक्की बघा :
आणि कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले:
युजरने या खास क्षणाचा एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, माझी मुलगी “मन्नत” तिच्या वडिलांच्या रोल मॉडेल @iamsrk शाहरुख खानला भेटण्यासाठी कशी गेली याचा छोटासा प्रवास.हा खरोखरच आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता. तसेच शाहरुख खान तुझ्यासारखा कोणीच नव्हता आणि तुझ्यासारखा कोणीही नसेल.तू माझा पृथ्वीवरचा देव आहेस आणि आपल्या पत्नीला टॅग करत @iamkajalarya आमच्या तिघांसाठी हा आयुष्यातील अविस्मारणीय क्षण नाही का ? असे खास कॅप्शन युजरने या पोस्टला दिले आहे.
युजर जतीन गुप्ता याने @iamjating या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.व्हिडीओ पाहून अनेक जण विविध शब्दात कुटुंबाच्या
या खास क्षणाचे वर्णन करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत आणि एकंदरीतच सोशल मीडियावर या खास व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.