scorecardresearch

Premium

सकाळी शेअर मार्केट अन् दिवसभर रिक्षा; ट्रेडर रिक्षाचालकाचा VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Share Market मधलं नुकसान भरून काढायला निघाला अन् रातोरात स्टार झाला

Trader Rickshaw Driver video goes viral on social media share market trading
सकाळी शेअर मार्केट अन् दिवसभर रिक्षा

Viral video: सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरुणांना परिस्थितीमुळे त्यांची स्वप्न बाजूला ठेवावी लागतात. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पडल्यामुळे काही स्वप्न ही स्वप्नच राहतात. याच धावपळीत अनेकांनी आपली आवड, कलाही जोपसता येत नाही. मात्र २४ वर्षांचा विशाल पाईकराव यानं कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत आपली आवडही जोपासली आहे. सकाळी शेअर मार्केट आणि दिवसभर रिक्षा चावणाऱ्या विशालचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशाल हा सकाळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करतो तर दिवसभर रिक्षा चावतो. या ट्रेडर रिक्षाचालक विशालचा हा प्रवास सोपा नाहीये, चला तर जाणून घेऊयात या अवलिया बद्दल..

सकाळी शेअर मार्केट दिवसभर रिक्षा

enjoy every moment death is unexpected quote written on back of auto rickshaw video goes viral
रिक्षामागे पठ्ठ्याने लिहिले असे की Video पाहून युजर्स म्हणाले, “बरोबर बोललास भावा…”
a Man throws cash from luxury speeding range rover car
Video : श्रीमंतीचा दिखावा! चालत्या गाडीतून भर रस्त्यावर नोटा उडवताना दिसला तरुण, पोलिसांनी ठोठावला तब्बल एवढा दंड
mumbai girl made Pink Biryani for Barbie theme party
Mumbai : गुलाबी बिर्याणी! मुंबईच्या तरुणीने बार्बी थीम पार्टीसाठी चक्क बनवली गुलाबी रंगाची बिर्याणी; नेटकऱ्यांनी केले ट्रोल, VIDEO व्हायरल
Viral Video Of Chat seller entered in a luxurious car and set up a Dahiwada stall Will Win Your Heart Must Watch
VIDEO: आलिशान गाडीतून एंट्री अन् दहीवड्याचा स्टॉल; विक्रेत्याची शैली पाहून व्हाल अवाक्

विशाल पाईकराव सध्या सोशल मीडियावर चांगलाच झळकत आहे. मात्र त्या मागचा त्याचा संघर्ष खूप मोठा आहे. खांद्यावर जबाबदारी असल्यामुळे विशालनं पूर्वीपासूनच पडेल ते काम केलं आहे. कधी हॉटेलमध्ये वेटरचा जॉब कधी सेक्युरिटी गार्ड तर कधी कुरीयर बॉय. यानंतर त्याला शेअर मार्केटबद्दल कळलं आणि त्यानं त्यामध्ये शिकायला सुरुवात केली. हळूहळू त्यानं यामधून पैसे कमवले अन् त्यातलं नुकसान भरुन काढण्यासाठी रिक्षा घेतली. आता तो सकाळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करतो तर दिवसभर रिक्षा चावतो.

कुटुंबाचा सपोर्ट पण नातेवाईकांचे टोमणे

विशाल सांगतो हे करत असताना कुटुंबाचा सपोर्ट पण नातेवाईक टोमणे मारायचे. “लोक बोलायचे शेअर मार्केटमध्ये बरबाद होशील पूर्णवेळ रिक्षा चालव किंवा नोकरी कर. तेव्हा मी लोकांना सांगायचो ही रिक्षासुद्दा मी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगवरच घेतली आहे. अशाच प्रकारे शेअर मार्केटद्वारे मी माझी आणि घरच्यांची सगळी स्वप्न पूर्ण करेन” असंही तो सांगतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: कुत्र्याला वाचवण्यासाठी तरुणाने रुळावर उडी मारली, तितक्यात आली ट्रेन आणि मग जे घडलं ते…

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trader rickshaw driver video goes viral on social media share market trading srk

First published on: 04-12-2023 at 13:29 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×